बहुचर्चित ‘धडक’चा ट्रेलर प्रदर्शित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठीतला सुपरहिट चित्रपट सैराट याचा हिंदी रिमेक असलेला बहुचर्चित धडकचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ट्रेलरवरून तरी सैराटची हिंदी कॉपी वाटत आहे. अगदी पार्श्वसंगीत ते चित्रपटातील प्रमुख दृश्यांमध्ये समानता आढळत असल्याने आता नवीन काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर इशान खट्टरच्या तुलनेत जान्हवी कपूर ट्रेलरमध्ये तरी फारशी कमाल दाखवू शकलेली नाही. पण, खरं चित्र चित्रपट पाहिल्यानंतरच स्पष्ट होईल. या दोघांच्या तुलनेने खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेते आशुतोष राणा या ३ मिनिटांच्या ट्रेलरमध्ये चांगलाच भाव खाऊन गेले आहेत. सैराटचं वैशिष्ट्य असलेलं कॅमेरावर्क ट्रेलर पाहिल्यानंतर सुखावणारं वाटतंय. थोडक्यात सैराटची हुबेहुब नक्कल असलेला धडक प्रेक्षकांच्या मनात किती धडक देणार ते २० जुलै नंतरच कळेल.

पाहा व्हिडीओ-