बीडमध्ये ‘ताई’चीच कॉलर टाईट, सुरेश धस यांचा विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

suresh-dhas-anna-1

सामना प्रतिनिधी । बीड

बीड-धाराशीव-लातूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचे सुरेश धस यांचा विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव केला आहे. ५२७ मतं मिळवणाऱ्या सुरेश धस यांनी ७८ मतांनी जगदाळे यांचा पराभव केला आहे. या विजयानंतर मुंडे भगिनींनीच वर्चस्व गाजवल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांनी खरं तर कडवी झुंज दिली. मात्र हक्काच्या मतांमध्ये फाटाफूट झाल्याने जगदाळे यांना पराभवाचा धक्का बसला. सुरेश धस यांचा विजय पंकजा मुंडे यांच्यासाठी महत्वाचा मानला जात आहे. कारण या विजयानं त्यांची छबी अधिक बळकट बनल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

या निवडणुकीत सुरेश धस यांना ५२६ मतं पडल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. तर अशोक जगदाळे ४५१ मतं पडली आहेत. २५ मतं बाद धरण्यात आली असून एक मत नोटाला देखील पडलं आहे. मात्र या मतमोजणीवर आक्षेप घेत राष्ट्रवादीकडून फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, सांकेतिक खुणा-आकड्यांमुळे २५ मतं बाद धरण्यात आली आहेत.