अक्षय कुमारच्या गोल्डचं नव पोस्टर रिलीज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा अगामी ‘गोल्ड’ चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटाचं नविन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. हे पोस्टर अक्षय कुमारने ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केलं आहे. गोल्ड हा चित्रपट हिंदुस्थानी हॉकीपटू दलबीर सिंह याच्या जीवन प्रवासावर आधारित आहे. दलबीर सिंहने हिंदुस्थानला १९४८ मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिक येथे हॉकी या खेळासाठी पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं. या चित्रपटाट दलबीर सिंहची भूमिका अक्षय कुमार साकारणार आहे.

गोल्ड चित्रपटाचं पोस्टर अक्षय कुमारने पोस्ट करत त्यावर एक ट्विट केलं आहे. ‘ देश बनता है जब सब देशवासियों की आंखों में एक सपना होता है’. या ट्विटमध्ये त्याने असं लिहीलं आहे की, देशातल्या सर्व लोकांच्या डोळ्यात एक स्वप्न असतं तेव्हा देश घडतो. या चित्रपटात अक्षय कुमारसह मौनी रॉय, सनी कौशल, कुनाल कहूर आणि अमित साध हे अन्य कलाकार आहेत. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०१८ ला प्रदर्शित होणार आहे .