
सामना प्रतिनिधी । नगर
नगर महानगरपालिकेने सिना नदी पात्रातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली असून काटवन खंडोबा येथील अतिक्रमण काढण्यात आले आहे. त्यानंतर शेजारी असलेली पक्की बांधकामे पाडण्यास सुरुवात झाली असून अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्या पथकाने आज सकाळपासून पुन्हा या अनधिकृत बांधकामावर हातोडा मारण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अधिपत्याखाली कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.
गेल्या बारा दिवसांपासून शहरात सिना नदीपात्रातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे. आज येथील एका मार्बलच्या दुकानाचे वाढत गेलेले अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पाच दिवसांपासून सिना नदीपात्रात अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे. या आगोदर महानगरपालिकेने या नदीपात्रातील सुमारे सात हजार मॅट्रिक टन माती काढली आहे.

























































