डान्सिंग अंकल नंतर डान्सिंग आंटीची धूम, व्हिडीओ तुफान व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

आपल्या भन्नाट डान्समुळे इंटरनेटवर सुपरडुपर हिट ठरलेले ‘गोविंदा काका’ म्हणजेच मध्यप्रदेशातील संजीव श्रीवास्तव यांच्या नंतर आता एका डान्सिंग आंटीची सर्वत्र धूम पाहायला मिळत आहे. यो यो हनी सिंगच्या एका गाण्यावर थिरकणाऱ्या डान्सिंग आंटीने सध्या सोशल मिडीयावर सॉलिड हवा केली आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ‘पार्टी ऑल नाइट’ या गाण्यावर आंटी साडीत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. आंटीचा हा व्हिडीओ ‘व्हायरल गुजरात’ या नावाने फेसबुकवर पोस्ट करण्यात आला आहे. लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला असून आता याला २.३ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.