मला कर्जबुडव्यांचा ‘पोस्टरबॉय’ बनविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
मल्ल्या आठवड्याला 90 हजार रुपयांची फळे, भाज्या आणि इतर साहित्य खरेदी करतो

सामना ऑनलाईन । लंडन

राष्ट्रीयीकृत बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनला पसार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याने चोराच्या उलटय़ा बोंबा मारल्या आहेत. बँकांच्या कर्जाची परतफेड करण्याचे प्रयत्न मी केले. पण मला कर्जबुडव्यांचा ‘पोस्टरबॉय’ बनविले आहे. हे सर्व राजकीय हेतूने सुरू आहे, असा आरोप मल्ल्याने केला आहे.

विजय मल्ल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना १५ एप्रिल २०१६ ला एक पत्र पाठवून आपली बाजू मांडली होती, मात्र या पत्राला कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे हे पत्र सार्वजनिक करीत आहे असे मल्ल्याने म्हटले आहे.

विजय मल्ल्याने या पत्रात सहा मुद्दे मांडले आहेत. माझे नाव घेताच लोक भडकतात. बँकांच्या कर्जाची परतफेड करण्याचे मी प्रयत्न केले, पण मला कर्जबुडव्यांचा ‘पोस्टरबॉय’ बनवले आहे. हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असेल तर त्याला मी काहीही करू शकत नाही असे मल्ल्या म्हणाला. ‘ईडी’ने मनी लॉण्डरिंग कायद्यांतर्गत कारवाई करताना माझ्या कंपन्या, कुटुंबीय आणि माझ्या मालकीची १३,९०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. बँकांचे कर्ज परत करण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही त्याने केला आहे.