एका आठवड्यात लेप्टोचा तिसरा बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी ,मुंबई

पावसाळय़ाला सुरुवात होताच साथीच्या आजारांनीही डोके वर काढले आहे. मालाडमधील एका २१ वर्षीय तरुणीचा लेप्टोस्पायरोसिसने बळी घेतला आहे. गेल्या आठवडाभरातला लेप्टोचा हा तिसरा बळी आहे. तर डेंग्यूने आधीच एकाचा बळी घेतल्यामुळे साथीच्या आजारांचे चार बळी झाले आहेत. डेंग्यूने दगावलेली व्यक्ती उत्तरप्रदेशातील असून तिच्यावर पालिका रुग्णालयात उपचार सुरू होते.

पावसाळी साथीच्या आजारांनीही मुंबईत हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. डेंग्यू, लेप्टो, मलेरिया, गॅस्ट्रो, कावीळ अशा साथीच्या आजारांच्या रुग्णांची पालिकेच्या रुग्णालयांत आणि दवाखान्यात संख्या वाढली आहे. जून महिन्यात विविध आजारांनी आजारी असलेले एकूण १२३५ रुग्ण आढळले. त्यात गॅस्ट्रोचे सर्वाधिक रुग्ण असून त्यापाठोपाठ मलेरियाचे रुग्ण आढळले आहेत, तर लेप्टोचे ५ रुग्ण आढळले असून त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे.

pelto