चेंडू कुरतडणारा ६ कसोटींना मुकणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | डब्लिन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट लढतींत चेंडू कुरतडणाऱ्या क्रिकेटपटूला आता आपल्या गुन्ह्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.आयसीसीने आयर्लंडची राजधानी डब्लिन येथे आयोजित बैठकीत चेंडू कुरतडणे(बॉल टॅम्परिंग) हा गंभीर गुन्हा ठरवला आहे. हा गुन्हा करणारा खेळाडू ६ कसोटी लढती अथवा १२ वनडे सामन्यांना मुकणार आहे. बॉल टॅम्परिंग हा क्रिकेटमधील तिसऱ्या दर्जाचा (लेव्हल ३ ) गुन्हा ठरणार आहे.

याच वर्षी केपटाऊन कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या स्टीवन स्मिथ ,डेविड वॉर्नर व कॅमेरून बेनक्राफ्ट हे स्टार क्रिकेटर बॉल टॅम्परिंग प्रकरणी दोषी आढळले होते.त्यानंतर श्रीलंकन कर्णधार दिनेश चंडिमलवरही चेंडू कुरतण्याचा गंभीर आरोप झाला होता. त्यामुळे क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली होती.सर्वच थरातून चेंडू कुरतडणे हा गंभीर गुन्हा ठरवावा हि मागणी होत होती. ती अखेर आयसीसीने डब्लिनच्या बैठकीत मान्य केली आहे.