
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
समाजमाध्यमावर पसरणाऱया अफवांमुळे देशात अनेक ठिकाणी हिंसा वाढली आहे. या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅपने अफवांना पायबंद घालण्यासाठी नवे फिचर आणण्याची ग्वाही दिली आहे. धुळय़ातील साक्रीमध्ये अफवेतून गोसावी समाजाच्या पाचजणांचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला. त्याअगोदर अफवांमुळे देशात विविध ठिकाणी अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले. या पार्श्वभूमीवर केंद्राने व्हॉटस्ऍपला नोटीस पाठवली. या नोटीसला प्रतिसाद देऊन अफवांना रोखण्याचे आश्वासन मिळाले आहे. व्हॉटस्अॅप जनतेची सुरक्षा आणि संवादाची काळजी घेत असून आम्हाला असे वाटत नाही की ही सेवा घातक आहे. कोणीही या सेवेचा वापर चुकीच्या पद्धतीने करू नये. या अफवा रोखता येतील अशी व्यवस्था कंपनी लवकरच आणेल असे व्हॉटस्ऍपच्या प्रवक्त्याने केंद्र सरकारला आश्वासन देताना म्हटले आहे.

























































