केडगाव हत्याकांड,व्हिडीओ पोलिसांच्या हाती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

केडगाव दुहेरी हत्याकांडातील मृत्यू झालेल्या एकाचा गळा कापतानाचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याचा दोषारोपपत्रात समावेश केला असून हा व्हिडीओ हत्याकांडात महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे. काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाबही दोषारोपपत्रात समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पुढील तपासासाठी सीआयडीने पाच पथके तैनात केली आहेत. राजकीय वादातून ७ एप्रिल रोजी केडगावात शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे या दोघांची हत्या करण्यात आली होती. संदीप गुंजाळ जखमी अवस्थेतील एकाचा खून करतानाचा व्हिडीओ आहे. त्या व्हिडीओची सीडी निनावी पत्राद्वारे पोलिसांना पाठविली होती.