सीमेवरील बीएसएफ जवानांच्या “पहारा चौक्या” होणार वातानुकूलित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | नवी दिल्ली 

हिन्दुस्थानच्या सीमेचं रक्षण करणा-या सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) जवानांना राज्यस्थानमध्ये वाळवंटात मोठ्या उष्णतेचा सामना करावा लागतो. सिमेवरील पहारा चौक्यांवर  (ऑब्जरवेशन पोस्ट) पाकड्यांच्या कुरापतींवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात असलेले जवान जवळपास ५० डिग्री पेक्षा जास्त तापमानात जीवाची पर्वा न करता आपलं कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे आता या जवानांचे उकाड्यापासून संरक्षण करण्यासाठी सिमेवरील ऑब्जर्वेशन पोस्ट वातानुकूलित (एअर कंडीशन) करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

प्रायोगिक तत्वावर सध्या बीएसएफच्या जैसलमेरमधील ५६ बटालियन मधील काही ठिकाणी अशा प्रकारच्या एअर  कंडीशन ऑब्जरवेशन पोस्ट तयार करण्यात आल्या आहेत. या ऑब्जरवेशन पोस्टमध्ये विशेष अशा सुविधा असणार आहेत, ज्यामुळे बीएसएफ जवान उष्णतेबरोबरच वावटळीपासून आपले रक्षण करु शकतील आणि सीमेवर चोख पहारा ठेवू शकतील. सुत्रांच्या माहितीनुसार येत्या उन्हाळ्यापर्यंत सिमावर्ती भागात जवळपास प्रत्येक तीन किलोमिटरवर अशाप्रकारच्या एअर कंडीशन ऑब्जरवेशन पोस्ट तयार करण्यात येणार आहेत.

सध्याच्या परिस्थितीत आपले जवान भीषण उष्णतेमध्येही गस्तीचे काम करतायेत, त्यासाठी त्यांना नेहमी ग्लूकोज आणि लिंबू पाणी दिले जाते. त्याच प्रमाणे प्रत्येक दोन तांसांनी ड्यूटी बदलली जाते. मात्र एअर कंडीशन ऑब्जरवेशन पोस्टमुळे बीएसएफच्या जवानांना मोठा दिलासा मिळणार आहे.