दारुच्या नशेत तरुण फिनेल प्यायला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

दारूच्या नशेत एक तरुण फिनेल प्यायल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीतील कुवे-लांजा येथे घडली आहे. विशाल विजय खानविलकर (२३) असे त्याचे नाव आहे. विशालवर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. विशालची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.