
सामना प्रतिनिधी । पिंपरी
सुट्टे पैसे न दिल्याने महिलेला दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना रहाटणी फाटा येथे शनिवारी (दि. १४) रात्री घडली.
कमल हरिभाऊ वंजारी (वय ३२, रा. मल्हारनगर, थेरगाव) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. गजू पुनाजी गायकवाड (वय ५५) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास रहाटणी फाटा येथील एका मिठाईच्या दुकानाजवळ आरोपी गायकवाड यांनी कमल यांच्याकडे १०० रुपये सुट्टे मागितले. मात्र, कमल यांनी सुट्टे पैसे देण्यास नकार दिला. या कारणावरून चिडलेल्या गायकवाड यांनी कमल यांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले.






























































