
सामना ऑनलाईन । दंतेवाडा
छत्तीसगढमधील दंतेवाडा बीजापूर सीमेवरील तिमेनारा जंगलात जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आठ नक्षलवाद्यांच्या खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये तीन महिला नक्षलवाद्यांचा देखील समावेश आहे. या सर्वांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला आहे.
Chhattisgarh: 7 bodies of naxals, including 3 females, recovered this morning from Timenar forest area, near Dantewada-Bijapur border, following encounter with team of District Reserve Guard&STF. 2 INSAS rifles, two .303 rifles&one 12 bore rifle also recovered. Encounter underway
— ANI (@ANI) July 19, 2018
#UPDATE: Body of one more naxal has been found from the site of encounter in Timenar forest area, near Dantewada-Bijapur border. A total of 8 bodies of naxals have been recovered following their encounter with a joint team of DRG-STF. #Chhattisgarh https://t.co/QqcrCeM2LV
— ANI (@ANI) July 19, 2018
जिल्हा राखील दल व विशेष कृती दलाच्या जवानांनी तिमेनारा जंगलातील नक्षलग्रस्त भागात शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहीमेदरम्यान जवान व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आता पर्यंत आठ नक्षलींचा खात्मा करण्यात आला आहे. अद्याप या भागात शोध मोहीम सुरू आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी २ इंसास रायफल, दोन ३०३ रायफल्स, एक १२ बोर रायफल तसेच दारु गोळा जप्त केला आहे.

























































