
सामना प्रतिनिधी । कोलकाता
येत्या स्वातंत्र्य दिनापासून ‘तृणमूल काँग्रेस’ देशभरात ‘भाजप हटाओ, देश बचाओ’ अभियान सुरू करणार आहे, अशी घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केली. त्या शहीद दिनाच्या रॅलीत बोलत होत्या.
‘मॉब लिंचिंग’च्या घटना देशात वाढत चालल्या असून त्यातून ‘तालिबानी’ निर्माण केले जात आहेत, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक ही भाजपला जबरदस्त दणका देणारी असणार आहे. तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या सर्वच म्हणजे ४२ जागा जिंकून दाखवेल, असेही ममता बॅनर्जी यांनी सांगितले.‘
























































