
सामना प्रतिनिधी। इस्लापूर
गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना इस्लापूर पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. हे दोघे तेलंगनातून इनोव्हा गाडीतून गांजा भरलेली पाकिट घेऊन येत होते. पोलिसांनी त्यांच्याजवळून २४७ गांजा भरलेली पाकिट जप्त केली आहे. त्यांचे वजन ५ क्विंटल ३४ किलो आहे. ज्याची बाजारातील किंमत ३७ लाख ४४ हजार रुपये आहे. तर इनोव्हाची किंमत १० लाख असून एकूण ४८ लाखाचा माल मुद्देमालासह इस्लापूर पोलिसांनी डप्त केला आहे. तुषार सुरेश पिंपळे, शेख रियाज शेख सिराज अशी आरोपींची नावे आहेत.
गांजा तस्करी संदर्भातील जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली स पो नि. रामेश्वर कायंदे पुढील तपास करीत आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील सर्वच अवैध तस्करांचे धाबे दणाणले आहेत.






























































