
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
राज्यभरात प्लास्टिक बंदी लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या नगरपरिषदेच्या भरारी पथकाने शहरात ५० पेक्षा अधिक दुकानांवर धाडी टाकून सुमारे १४४० किलो पेक्षा जास्त प्लॅस्टिक जप्त केले आहे.
रत्नागिरीत बाजारपेठेतील बी.सी.ओसवाल या दुकानातून ६०० किलो प्लास्टिक जमा करण्यात आले आहे. तर गणेश वस्त्रनिकेतन मधून ३८४ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच अन्य दुकानांमधूनही थर्माकोल आणि प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच यापुढे प्लास्टीक आढळल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा या दुकानदारांना देण्यात आला आहे.




























































