
सामना प्रतिनिधी । ठाणे
दहावी-बारावीचे बोगस प्रमाणपत्र विद्यापीठात सादर करून बीकॉमचे प्रमाणपत्र मिळवल्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचपाखाडी येथील १२ (अ) प्रभागाचे भाजप नगरसेवक नारायण पवार यांनी नामनिर्देशित पत्रात छत्तीसगडच्या सी. व्ही. रमण विद्यापीठातून पदवीधर झाल्याचे नमूद केले होते. मात्र त्यांच्या शैक्षणिक अहर्तेवर आक्षेप घेत ठाणे न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाच्या चौकशीत पवार यांनी विद्यापीठात सादर केलेली शैक्षणिक प्रमाणपत्रे बोगस असल्याचे समोर आले. त्यामुळे विद्यापीठाने त्यांची पदवीही काढून घेतल्याने न्यायालयाने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.






























































