
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईची लाइफलाईन असणाऱ्या रेल्वे लोकल सेवेच्या मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर आज, रविवारी सकाळी ११ ते दुपारी ५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. हा विशेष ब्लॉक रुळ, सिग्नल यांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर घाटकोपर ते सीएसएमटी दरम्यान जलद व धीम्या मार्गावर, पश्चिम रेल्वेवर भायंदर ते नायगाव, हार्बरवर वाशी, बेलापूर, पनवेल मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेवर घाटकोपर ते सीएसएमटी दरम्यान ११ ते ४.३० दरम्यान जलद व धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या आज दिवसभर मध्य रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशीरा धावण्याची शक्यता आाहे. या ब्लॉकदरम्यान विद्याविहार, करिरोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड, मस्जीद या स्थानकांवर काही लोकल थांबणार नाहीत.
हार्बर रेल्वे
हार्बर मार्गावरील पनवेल वाशी मार्गावरील अप डाऊन दोन्ही गाड्या सकाळी ११ ते ४.३० पर्यंत बंद राहणार आहेत. या काळात सीएसएमटी ते वाशी विशेष लोकल चालविण्यात येणार आहे. तसेच या मार्गावरील प्रवाशांना ट्रान्स मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेच्या भायंदर ते नायगाव स्थानकांदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अप डाऊन जलद मार्गावर ब्लॉक आहे. त्यामुळे विरार, वसई ते बोरीवलीपर्यंत दोन्ही मार्गांवर लोकल धीम्या मार्गावर चालतील.
SUMMARY : MEGABLOCK ON CENTRAL, WESTERN, HARBOUR RAILWAYS



























































