मुलुंडमध्ये बिबट्या, रहिवाशांमध्ये घबराट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुलुंडच्या राहुलनगरमध्ये मध्यरात्री बिबट्याच्या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सूरज गवई असे या तरुणाचे नाव असून त्याला केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.

मुलुंडच्या राहुलनगरमध्ये मध्यरात्री दोनच्या सुमारास बिबट्या शिरला. या ठिकाणी राहणाऱ्या गवई यांच्या कुत्र्यावर त्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या प्रचंड आवाजामुळे गवई यांनी घराबाहेर धाव घेतली, मात्र बिबट्याने त्यांच्यावरच हल्ला केला. काही दिवसांपूर्वीच मुलुंडमध्येच बिबट्याच्या हल्ल्यात सहाजण जखमी झाले होते.