
सामना ऑनलाईन । नँजिंग
जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या दिवशी हिंदुस्थानच्या एच. एस. प्रणॉयपाठोपाठ समीर कर्मानेही पुरुष एकेरीत विजयी सलामी दिली असून पुरुष दुहेरीत मनू अत्री आणि बी. सुमिथ रेड्डी या जोडीने पहिल्या फेरीचा अडथळा पार केला.
समीरने फ्रान्सच्या लुकास कोरकीकर २१-१३, २१-१० अशा सरळ दोन गेममध्ये ४० मिनिटांत मात करत पुढची फेरी गाठली. जागतिक मानांकनात ११व्या स्थानावर असलेल्या प्रणॉयने १०९ व्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडच्या अभिनव मनोटाला अवघ्या २८ मिनिटांत २१-१२, २१-११ असे सरळ गेममध्ये पराभूत करत आगेकूच केली. पुढील फेरीत प्रणॉयचा सामना ब्राझीलच्या के. योगोर कोएल्होबरोबर होणार आहे. पुरुष दुहेरीत जागतिक मानांकनात २२ व्या स्थानावर मनू अत्री आणि बी. सुमिथ रेड्डी जोडीने बल्गेरियाच्या डॅनियल निकोलोक्ह आणि इक्हान रुसेक्हचा २१-१३, २१-१८ असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. दुसर्या फेरीत त्यांचा सामना जपानच्या ताकुतो इनोए आणि युकी कानेको या जोडीशी होणार आहे.
मिश्र दुहेरीत प्रणव चोप्रा आणि एन. सिक्कीस रेड्डी या जोडीने झेक प्रजासत्ताकच्या जाकुब बिटमान आणि अल्बे टा बासोवा या जोडीवर २१-१७, २१-१५ अशी मात करत अंतिम १६ मध्ये प्रवेश केला. या ठिकाणी त्यांच्यासमोर इंडोनेशियाच्या हाफीज फैजल आणि ग्लोबरिया विदजा या जोडीचे आव्हान आहे. महिला दुहेरीत मात्र हिंदुस्थानच्या संजोगीता घोरपडे आणि प्राजक्ता सावंत या जोडीचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. तुर्कस्तानच्या बेंगिस इर्सेटिन आणि नॅझलिकॅन इंसी या जोडीने हिंदुस्थानी जोडीकर २२-२०, २१-१४ अशा सरळ गेममध्ये मात केली.




























































