कुडाळात ४ ऑगस्ट पासून सिंधु एज्युकेशन एक्स्पोचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने शनिवार ते सोमवार ६ ऑगस्ट या कालावधीत सिंधु एज्युकेशन एक्स्पो २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. वासुदेवानंद ट्रेड सेंटर, कुडाळ येथे हा कार्यक्रम होणार आहे. कोकणात अशाप्रकारे प्रथमच शैक्षणिक प्रदर्शन होत आहे. या तीन दिवसीय शैक्षणिक प्रदर्शनामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरातील विविध शैक्षणिक संस्थांचे स्टॉल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन स्टॉल, व्यवसाय संधी, अभ्यासक्रमांच्या माहितीचे स्टॉल, मुक्त परिसंवाद, थ्रीडी अॅनिमेशन शो यासह वैविध्यपूर्ण परिपूर्ण मार्गदर्शनाची मेजवानी येथे असणार आहे अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई व शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी कुडाळ येथे दिली.

कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृहावर मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत हि माहिती देण्यात आली. यावर अनेक मान्यवर उपस्थित होते.

जि.प.प्राथ. शाळेतील अध्यापन पद्धत, भौतिक सुविधा, लोकसहभाग उपक्रम, शिक्षकांचे शैक्षणिक उपक्रम यामध्ये विद्यार्थांनी साधलेल्या यशस्वीततेच्या गाथा यांना योग्य व व्यापक प्रसिद्धी देऊन जास्तीत जास्त पालक व विदयार्थी यांना जि.पच्या प्राथमिक शाळांमध्ये आकर्षित करणे तसेच जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व त्याचा पालकांना तसेच शिक्षण प्रेमींना शालेय विषयांच्या पलिकडे जाऊन व्यवसाय, उद्योग, प्रशिक्षणाच्या संधी याबाबत तज्ञाकडून मार्गदर्शन उपलब्ध करून देणे. विद्यार्थाना सध्या उपलब्ध असलेल्या काही शिक्षणसंधी बाबत तज्ञाकडून मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, करियर निवडण्यासाठी मार्गदर्शन करणे, विषय निवड व व्यवसाय निवड प्रक्रियेची पूर्वतयारी करणेसाठी मदत करणे, व विद्यार्थ्यांना करियर निवडण्यासाठी पूरक माहिती उपलब्ध करून देणे या उद्देशाने या एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जि. प.पदाधिका-यांनी दिली.

या एक्स्पो मध्ये शैक्षणिक व करियर गायडन्स संदर्भात विविध प्रकारचे ५० स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यातील विविध नामांकित शैक्षणिक संस्थांचे स्टॉल या एज्युकेशन एक्स्पो मध्ये पाहावेत व महिती घेण्यास उपलब्ध असणार आहेत. त्याच बरोबर राज्यातील नामवंत शिक्षण तज्ज्ञ विद्यार्थांना मार्गदर्शन करणार आहे. रविवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत महेश चोथे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सांगली हे करियर निवडण्याची सप्तसुत्री या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर १२ ते १ या वेळेत विजय आरोलकर, शास्त्रज्ञ सायंटिफिक ऑफिसर, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुमबी हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ३ ते ४ या वेळेत अरविंद नातू, शास्त्रज्ञ आयशर पुणे यांचे व्यख्यान होणार आहे.