गोव्यातील आमदार अंडी घेऊन विधानसभेत गेले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पणजी

गोव्यातील काँग्रेसचे आमदार अलेक्सो रेगिनाल्डो हे आज गोव्याच्या विधानसभेत अंडी घेऊन आले होते. त्यांनी अंडी आणल्याने विधानसभेत काही काळ घबराट पसरली होती मात्र नंतर त्यांनी आणलेली अंडी ही प्लास्टिकची असल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यात विकल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या अंड्याचा मुद्दा अधिवेशनाच्या वेळी उपस्थित करण्यासाठी त्यांनी ही अंडी आणली होती.

‘आज मी तीन अंडी विकत घेतली असून ती प्लास्टिकची अंडी आहेत. गोव्यात सध्या सर्रास प्लास्टिकची अंडी विकली जात आहेत. ही अंडी हानिकारक असून त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो.’ असे अलेक्सो रेगिनाल्डो यांनी विधानसभेत सांगितले.

दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मात्र अशा प्रकारची अंडी विकली जात नसल्याचे सांगितले आहे. तसेच काँग्रेस अामदाराचे आरोप खरे आहेत की खोटे ते तपासण्यासाठी त्यांनी आणलेली अंडी प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.