मँचेस्टरमधील धमाक्यात ‘सलमान’चा हात, भावाची चौकशी सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

तीन वर्षांपूर्वी ब्रिटिश नौदलाने ज्याला हिंसाग्रस्त लिबियातून वाचवले त्या सलमान अबेदीनेच गेल्या वर्षी मँचेस्टरमधील पॉप कन्सर्टमधे आत्मघाती धमाके घडवल्याचे स्पष्ट झाले आहे. सलमानने घडवून आणलेल्या या भीषण स्फोटात २२ नागरिकांचा मृत्यू झाला होता.

इंग्लंडच्या डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, ऑगस्ट २०१४ मध्ये लिबियाई ब्रिटिश असलेल्या सलमान अबेदीला त्याच्या कुटुंबियांसह हिंसाग्रस्त लिबियातून बाहेर काढत सुखरूप माल्टाला नेले होते. ब्रिटनच्या एचएमएस इंटरप्रायझेस या नौदलाच्या जहाजाने अबेदी कुटुंबाचे प्राण वाचवले होते.आपल्यावरील ते उपकार विसरून जिहादच्या प्रेमात पडलेल्या सलमानने दहशतवादी संघटनांच्या बहकाव्यातून मँचेस्टरच्या संगीत रजनीत स्वतःच्या अंगावर स्फोटके बांधून भीषण आत्माती स्फोट घडवला आणि २२ नागरिकांचा बळी घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. २२ वर्षीय सलमानचा भाऊ हाशिम अबेदी याची आता ब्रिटिश पोलीस कसून चौकशी करीत आहेत.