
सामना प्रतिनिधी । पुणे
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात सध्या वातावरण तापलं आहे. आरक्षणाच्या आश्वासनांची पूर्ती न केल्यामुळे संतप्त झालेला मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाने आता मंत्री आणि आमदारांकडे आपला मोर्चा वळवला आहे. आज पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पुण्यातील कसाबा पेठेतील कार्यालयासमोर मराठा आंदोलकांनी घंट्टानाद आंदोलन सुरू केले असून यावेळी जोरदार घोषणा देखील देण्यात आल्या.
दरम्यान, याआधी बुधवारी लातूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलनाल करण्यात आलं होतं.
summary: maratha kranti morcha protest starts in front of girish bapat office, the guardian mister of pune
























































