मराठा आरक्षणासाठी शिरोळ तालुक्यात मोटारसायकल रॅली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनोज पोटे । जयसिंगपूर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून गुरुवारी शिरोळ तालुक्यातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. जयसिंगपुरातील नगरपालिका चौकातून आंदोलक मोटारसायकलवरून निघाले. शहरातील क्रांती चौकातील राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीस प्रारंभ झाला.

त्यानंतर शहरात ‘जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘कोण म्हणतो देणार नाय, आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाय’, अशा घोषणा देत रॅली सरू होती.