विभागप्रमुख, विभाग संघटक जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई शिवसेना विभाग क्रमांक २ मधील विभागप्रमुख आणि विभाग संघटकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. विभागप्रमुख म्हणून सुधाकर सुर्वे (विधानसभा – कांदिवली पूर्व, चारकोप, मालाड पश्चिम) आणि विभाग संघटक म्हणून विशाखा मोरये (विधानसभा – कांदिवली पूर्व, चारकोप, मालाड पश्चिम) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती नमूद आहे.

हजारो निराधार मनोरुग्णांना आधार देऊन मोफत उपचार करणाऱया बोरिवलीतील डॉ. भरत वाटवानी यांना नुकतात आशिया खंडातील नोबेल म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्त डॉ. भरत वाटवानी आणि त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता वाटवानी यांचा ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यावेळी विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, प्रकाश सुर्वे, विभाग संघटक रश्मी भोसले, नगरसेविका शीतल म्हात्रे, उपविभाग संघटक दीपा पाटील, शाखाप्रमुख मिलिंद म्हात्रे, शाखा संघटक शिल्पा पितळे आदी उपस्थित होते.