पैशांची सबब सांगून लोकांच्या जीवाशी खेळू नका, हायकोर्टाने प्रशासनाला फटकारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-highcourt

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील रेल्वे पुलांची दुरवस्था झाली असून या पुलांवरून जाताना प्रवाशांना जीव मुठीत ठेवावा लागतो. मुंबईतील या धोकादायक पुलांवरून हायकोर्टाने आज रेल्वे प्रशासनाला झापले. रेल्वेला प्रवाशांच्या जीवाची पर्वा आहे की नाही, अशा शब्दांत खडसावत पैशांची सबब सांगून लोकांच्या जीवाशी खेळू नका. रेल्वे हद्दीत येणाऱ्या सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्ती व रुंदीकरणाची कामे तातडीने हाती घ्या असे आदेश हायकोर्टाने आज प्रशासनाला दिले.

मुंबईतील अंधेरी येथे रेल्वेचा पूल कोसळून दोघेजण दगावल्याची घटना जुलैमध्ये घडली तर गेल्या वर्षी प्रभादेवी येथे चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेतही २३ जणांचा बळी गेला. या पुलांच्या दुरवस्थेवरून स्वाती त्रिवेदी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. रेल्वे प्रशासनाचे या पुलांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला खडे बोल सुनावले. मुंबईसाठी रेल्वे महत्त्वाची आहे पण रेल्वेसाठी मुंबईकर महत्त्वाचे आहेत का, असा सवालही प्रशासनाला न्यायमूर्तींनी विचारला.