
सामना ऑनलाईन, चेन्नई
बिर्याणीचं हॉटेल चालवणाऱ्या मालकाला जेव्हा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं तेव्हा त्याची अवस्था बघून डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले होते. आर.आर.अंबू बिर्याणी शॉप चालवणाऱ्या या मालकाला इतकं बेदम मारलं होतं की त्याचा चेहरा न ओळखण्याइतपत वाकडातिकडा झाला होता. त्याची ही हालत दिवंगत जयललिता यांच्या पक्षाच्या विद्यार्थी नेत्याने केली आहे.
Here is the CCTV footage of RSS Karyakarta Yuvaraj (Also working for DMK) and his cronies punching the cashier of RR Anbu Biriyani shop in Virugambakkam repeatedly, for denying them FREE BIRIYANI. pic.twitter.com/6yOSQ4Hbcc
— Unofficial Sususwamy (@swamv39) August 1, 2018
युवराज असं या युवा नेत्याचं नाव असून तो एक बॉक्सर आहे. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये युवराज हा बॉक्सिंगच्या रिंगमध्ये प्रतिस्पर्ध्याला नॉकआऊट करतो त्याच पद्धतीने या किरकोळ देहयष्टीच्या हॉटेल मालकाला बडवला आहे.


























































