‘छत्री’तून सामाजिक संदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मालवण

चित्रकारासाठी छत्री हा देखील एक कॅनव्हास असू शकतो. याच भावनेतून कट्टा वराडकर हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी छत्रीवर विविध सामाजिक संदेश देणारी चित्रे रेखाटून छत्रीला आणखीनच आकर्षक लूक दिला.

कट्टा वराडकर हायस्कूल येथे कला विषय समिती व कलाशिक्षक समीर चांदरकर यांच्या संकल्पनेतून छत्री रंगविणे कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उदघाटन संस्था पदाधिकारी व शिक्षकांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला ,

पावसाळा म्हटला की सर्वात आधी आठवते ती आपली छत्री. खरतर भर पावसात आपली खरी सोबती असते ती आपली छत्रीच, पण पावसात भिजून खराब होऊ नये म्हणून शक्यतो आपण काळ्या रंगाची छत्री निवडतो, पण ती चित्रकारासाठी कॅनव्हास असू शकतो, हे चांदरकर यांनी छत्रीवर शिवाजी महाराज, विठ्ठल, महात्मा फुले, मासे, तसेच विविध सामाजिक संदेश देणारी चित्रे रेखाटून विद्यार्थ्यांनी पटवून दिले. यावेळी छत्रीचा असाही उपयोग होऊ शकतो हे बघून मुलही उत्साहीत झाली होती.

summary…teacher-paint-social-message-on-umbrella