बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी उरणमध्ये एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी उरण पोलिसांनी एकाला अटक केली आहे. आशिष कुमार उर्फ कल्लू लखनलाल गौतम (वय २५ वर्ष, रा. घरहीखेडा, जाफराबाद, जिल्हा फतेपूर, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे.

उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांना खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार आशिष कुमार उर्फ कल्लू हा बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणारा असून तो द्रोणागिरी जवळील स्तरलींग  काटा येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानंतर उरण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तांबे, जी व्ही कराड, हवालदार पी जे मराडे, एस टी मोहिते, राजेंद्र खरात, संजय कुथे, रोहित राठोड आणि पोलिसांनी सापळा लावून आशिष कुमार उर्फ बबलू याला अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे व मॅगझीन असा रुपये २५ हजार रुपये किंमतीचा माल हस्तगत केला आहे. त्याच्या विरुद्ध उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. उरण पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.