
सामना ऑनलाईन । शहापूर
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातल्या तुते गावात दूषित पाण्यामुळे १८ जणांना अतिसाराची लागण झाली आहे. शनिवारी रात्री गावातील नागरिकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत असल्याने सर्व रुग्णांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर रुग्णांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान ग्रामपंचायतीने साफसफाई न केल्यामुळे बोअरवेलमध्ये दूषित पाणी गेले आणि त्या बोअरवेलचे पाणी प्यायल्याने नागरिकांना उलट्या जुलाब होऊ लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रुग्णांमध्ये ४ महिला, एक १३ वर्षांची मुलगी आणि १३ पुरुषांचा समावेश आहे.

























































