
पटावर प्रत्येक चालीला होणारी चकमक, घड्याळाशी सुरू असलेली जीवघेणी झुंज आणि प्रत्येक डावात विजयासाठी शेवटपर्यंत सुरू असलेला संघर्ष तिसऱ्या डावातही कायम होता. फिडे विश्वविजेतेपदाच्या लढतीतील पहिल्या तीन डावांनी चाहत्यांची उत्सुकता कमालीची वाढवली आहे. जगज्जेता गुकेश दोम्माराजू आणि आव्हानवीर जावोखिर सिंदारोव्ह या दोघांपैकी पुणीही माघार घेतली नाही. तीन डाव झाले, पण विजयाचे खाते अद्याप कोणालाही उघडता आलेले नाही. शनिवारी सुरू होणारा चौथा डाव बरोबरीची कोंडी फोडत विजयाचा असावा अशी साऱयांची अपेक्षा आहे.
पहिल्या डावात गुकेशला वेळेच्या संकटातून बाहेर पडत बरोबरी साधावी लागली. दुसऱया डावात दोघांनी केवळ 20 चालींतच बरोबरी स्वीकारली. हा प्रकार भुवया उंचावणारा होता. काल तिसऱया डावात मात्र 60 चालींचा, चार तास 49 मिनिटांचा संघर्ष रंगला.
पहिल्या डावात गुकेशची कसोटी – पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळणाऱया सिंदारोव्हने सुरुवातीपासून गुकेशवर दबाव आणला. गुकेशने एका चालीवर 36 मिनिटांहून अधिक वेळ खर्च केला. घडय़ाळावर वेळ कमी होत असतानाही त्याने बचावाची सूत्रे सोडली नाहीत. सिंदारोव्हला विजयाची संधी दिसत होती, मात्र गुकेशने अचूक बचाव करत 38 चालींनंतर डाव बरोबरीत सोडवला.
दुसऱ्या डावात सावधगिरीचे राजकारण – यावेळी गुकेश पांढऱ्या मोहऱ्यांसह उतरला, मात्र सिंदारोव्हने त्याला मोकळेपणाने आक्रमणाची संधी दिली नाही. दोघांनीही एकमेकांच्या चालींचा अंदाज घेतला. पटावर निर्णायक आघाडी निर्माण करण्याची संधी न दिसल्याने 20 व्या चालीवर पुनरावृत्तीच्या माध्यमातून डाव बरोबरीत संपला.
तिसऱ्या डावात खऱया युद्धाची ठिणगी – गुकेशने पाचव्या चालीत बीई 7 ही अनपेक्षित चाल खेळून सिंदारोव्हला धक्का दिला.एकीकडे गुकेश वेगवान चाली करत होता, तर दुसरीकडे सिंदारोव्ह शांत बसला होता. मात्र 29 व्या चालीत एफ 4 या प्रतिहल्ल्याने डावात नवे वळण आले. 40 व्या चालीच्या वेळेच्या मर्यादेपूर्वी सिंदारोव्हकडे अवघे आठ सेपंद उरले होते. त्याने वेळेत चाल खेळून आपल्यावरच संकट टाळले. पुढे विरुद्ध रंगांच्या उंटांच्या अंतिम स्थितीत गुकेशला विजय मिळवता आला नाही. 60 चालींनंतर पुन्हा बरोबरीवरच संघर्ष थांबवावा लागला. गुणफलकावर 1.5-1.5 अशी बरोबरी असली तरी चौथ्या डावापासून संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
तिसऱ्या डावात घड्याळावर गुकेशची आघाडी, पण सिंदारोव्हचा अभेद्य बचाव
विश्वविजेतेपदाच्या तिसऱया डावात गुकेश आणि सिंदारोव्ह यांच्यात तब्बल 60 चालींचा महासंग्राम रंगला. काळय़ा मोहऱयांसह खेळणाऱया गुकेशने पाचव्या चालीवर अनपेक्षित पाचव्या चालीत बीई 7 ही चाल खेळत प्रतिस्पर्ध्याला तयारीबाहेर काढले. पहिल्या 15 चाली अवघ्या दोन मिनिटे 12 सेपंदांत पूर्ण करत त्याने घडय़ाळावर जवळपास 50 मिनिटांची आघाडी मिळवली, मात्र सिंदारोव्हने हार मानली नाही. 29 व्या चालीवर एफ 4 या धाडसी प्रतिहल्ल्याने त्याने गुकेशला बचावासाठी भाग पाडले. खरा थरार रंगला 40 व्या चालीपूर्वी. सिंदारोव्हकडे आठ सेपंद शिल्लक असताना त्याने वेळेत चाल खेळून संकट टाळले. पुढे दोघांनीही विजयासाठी जोरदार प्रयत्न केले, पण विरुद्ध रंगांच्या उंटांच्या अंतिम स्थितीत पुणालाही निर्णायक वार करता आला नाही. 60 व्या चालीवर हा डाव बरोबरीत संपवण्यातच दोघांनीही धन्यता मानली.


























































