वाळू माफियांचा हौदोस, तहसीलदारावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । नगर

नगर जिल्ह्यात वाळू माफियांचा हौदोस कायम सुरू असून नेवासा तहसीलदार उमेश पाटील यांच्या अंगावर वाळू तस्करांकडून जेसीबी घालण्याच्या प्रयत्न केला. उमेश पाटील हे बचावले असले तरी वाळू तस्कर मात्र पळून जाण्यात यशस्वी झाली.

निंबारी परिसरात प्रवरा नदी पत्रात आपल्या पथकासोबत पाटील सोमवारी रात्री १० च्या सुमारास कारवाईसाठी पोहोचले होते. मात्र कारवाईच्या दरम्यान वाळू तस्करांनी पाटील यांच्यावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाटील थोडक्यात बचावले. पण वाळू तस्कारांना पकडण्यात पथकाला यश आले नाही. दरम्यान, याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच ३०७, ३३२, ३५३, ३७९, ३८२, ३२४, १२०-ब, ३४,१४३, १४९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.