वयापेक्षा गुणवत्ता महत्त्वाची, भारतरत्न सचिन तेंडुलकरचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

राष्ट्रीय संघ निवडताना खेळाडूच्या वयाकडे अधिक लक्ष न देता त्याच्या गुणवत्तेकडे पाहणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले आहे भारतरत्न सचिन तेंडुलकर याने.

मी १६ वर्षांचा असताना पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात खेळलो. इम्रान खान, वासीम अक्रम, वकार युनूस, अब्दुल कादीर या त्यावेळच्या सर्वोत्तम गोलंदाजांना कसे सामोरे जायचे मला माहीतही नव्हते. पण एखाद्या खेळाडूकडे गुणवत्ता असेल तर त्याच्या वयाकडे बघितले जाऊ नये, असे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यावेळी म्हणाला.

सॅम करण व ओली पोप हे इंग्लंडचे युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहेत. यावर तो म्हणाला, युवा खेळाडू बेडरपणे मैदानात खेळ करतात. त्यांना फक्त चमकदार खेळ करायचा हेच माहीत असते. काही वेळा कसोटी पाहणारे क्षण येतात. पण यासाठीच तुम्ही देशासाठी खेळत असता, असे तो पुढे म्हणाला.