मुंबई-गोवा महामार्ग दुरुस्त न केल्यास अधिकाऱ्यावर कारवाई!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करून वाहतुकीसाठी योग्य करावा अन्यथा संबंधितांवर कारवाई वरण्यात येईल, असा इशारा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. पुढील वर्षीच्या गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाच्या चौपदरीवरणाचे प्रलंबित काम पूर्ण करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याना दिल्या.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, रत्नागिरी जिह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, सिंधुदुर्ग जिह्याचे पालकमंत्री दीपक केसरवर आदी उपस्थित होते.

गणेशोत्सवासाठी मुंबईतील चाकरमानी कोकणात जातात. या प्रवासात अपघात होऊ नये मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम तत्काळ सुरू करावे, या मार्गाला पर्याय असलेल्या पाली-खोपोली महामार्गावरील खड्डे बुजवून त्या मार्गावरील वाहतूव सुरू करावी. तसेच गणेशोत्सव काळात या मार्गावर अवजड वाहतूव पूर्णतः बंद न करता काही काळ ती सुरू ठेवण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. त्याचबरोबर पेण-वडखळ बायपास रस्ताही खुला करावा, असे निर्देश देण्यात आले.

मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाची प्रलंबित कामांची यादी वरून ती तातडीने पूर्ण वरण्याची कार्यवाही करावी. तसेच महामार्गाचे प्रलंबित भूसंपादन तातडीने पूर्ण वरून चौपदरीवरणाचे काम एक वर्षाच्या आत संपविण्याचे निर्देशही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याना दिले.

टोलमाफी द्या!

या महामार्गावर गणेशोत्सव कालावधीत वाढणारा वाहतुकीचा अतिरिक्त ताण काही प्रमाणात कमी होण्याच्या दृष्टीने मुंबई–पुणे–कोल्हापूरमार्गेदेखील प्रवास करण्यात येतो. त्यामुळे या महामार्गावरील टोलनाक्यांवर होणारी वाहतुकीची कोंडी विचारात घेऊन गतवर्षीप्रमाणेच या महामार्गावरून गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्यात यावी असे निर्देशदेखील सदर बैठकीत पाटील व शिंदे यांनी दिले.