
सामना ऑनलाईन । मुंबई
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या विरोधात धर्मनिपेक्ष समविचारी पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी करण्याबाबत लवकरच समविचारी पक्षांशी चर्चा करू, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी आज सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सीपीआय, सीपीआयएम, शेकाप, बहुजन समाज पक्ष, भारिप बहुजन महासंघ, समाजवादी पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, आरपीआय (गवई) व अन्य धर्मनिरपेक्ष समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याबाबत चर्चा झाल्याचे चव्हाण म्हणाले.

























































