कश्मीरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरच्या श्रीनगर येथील बटमालू भागात रविवारी हिंदुस्थानी सैन्य आणि दहशतवाद्यांच्या झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला. तर या चकमकीत एक जम्मू कश्मीर पोलीस आणि सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाले आहेत. सुरक्षा यंत्रणांना बाटामालू परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून झालेल्या शोधमोहिमेदरम्यान ही चकमक झाली. ही चकमक अद्यापही सुरू असल्याचे वृत्त आहे.