
सामना ऑनालाईन । टांपा
सूर्याच्या अधिक जवळ जाऊन सौरलहरींच्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी ‘नासा’ने सज्ज केलेल्या ‘पार्कर सोलर प्रोब याना’चे प्रक्षेपण रविवारी यशस्वी झाले. शनिवारी तांत्रिक अडचणीमुळे नियोजित वेळेआधी या यानाचे प्रक्षेपण स्थगित करण्यात आले होते.
#WATCH: NASA (National Aeronautics and Space Administration) launches #ParkerSolarProbe – its mission to send a satellite closer to the Sun – from Cape Canaveral, Florida in the US. (Source: NASA) pic.twitter.com/xjIBdZDC1Q
— ANI (@ANI) August 12, 2018
पार्कर सोलर प्रोब हे यान सूर्याच्या जवळून जाईल. आतापर्यंत सूर्याच्या कक्षेच्या इतक्या जवळ कुठलेही यान जाऊ शकले नव्हते. पृथ्वीला अविरत उर्जा देणाऱ्या सूर्याच्या अतिप्रचंड उष्णतेचा सामना करत हे यान त्याच्याबाबत अधिक माहिती मिळवेल.
१९५८ साली युजीन पार्कर या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा सौर हवेचे अनुमान लावले होते. सूर्यातून निघाणारे कण आणि जवळच असणार्या चुंबकीय क्षेत्रामुळे पृथ्वी तसेच आजूबाजूच्या उपग्रहांच्या कक्षाभ्रमणावर प्रभाव पडतो. पार्कर या शास्त्रज्ञाची आठवण म्हणून या यानाचे पार्कर प्रोब ठेवण्यात आले आहे.
कारच्या आकाराचे असलेले हे यान सूर्याच्या कक्षेपासून ३८.३ लाख मैल अंतरावरून सूर्याला समांतर प्रवास करेल. यापूर्वी कुठल्याचा अंतराळयानाने इतकी उष्णता आणि प्रकाशाचा सामना केला नव्हता. पार्कर सोलर प्रोबसोबत अनेक उपकरणे पाठवली आहेत. ही उपकरणं सूर्याचा पृष्ठभाग आणि अंतर्गत रचना यांचा शोध घेणार आहेत. सात वर्षांच्या अभियानात हे यान सूर्याभोवत २४ वेळा परिभ्रमण करणार आहे. नासाने आयोजित केलेलं हे आजवरचं सर्वात साहसी अभियान आहे.




























































