
सामना ऑनलाईन, मुंबई
कर्करोगाचे निदान झाल्याने अमेरिकेत उपचार घेत असलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिची नुकतीच अभिनेते अनुपम खेर यांनी न्यूयॉर्कमध्ये जाऊन भेट घेतली. सोनाली ही कर्करोगाशी मोठ्या धीराने झुंज देत आहे. तिची ती झुंज पाहून अनुपम यांनी ट्विटरवर ‘ती माझी हीरो आहे’ असे ट्वीट केले आहे.
सोनाली बेंद्रे ही न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. अनुपम खेर हे काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत गेले होते. त्यांनी न्यूयॉर्कमध्ये जाऊन सोनालीची भेट घेतली. सोनाली आजाराशी कशी झुंज देतेय, हे त्यांनी १५ दिवस पाहिले. त्यानंतर सोनालीबरोबरच्या आठवणी त्यांनी ट्विटरवर जागृत केल्या. ‘सोनालीबरोबर मी काही चित्रपट केले आहेत. मुंबईत एरवीही आमच्या गाठीभेटी होतात. सोनाली एक हुशार आणि सहृदयी व्यक्ती आहे. गेल्या १५ दिवसांत मी न्यूयॉर्कमध्ये तिला आजाराशी झुंज देताना प्रत्यक्ष पाहिले. ती माझ्यासाठी हीरोच आहे’ असे ट्वीट अनुपम यांनी केले आहे.




























































