लाल किल्ल्यावरून मोदींचे निवडणुकीचे भाषण!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

देशाच्या ७२ व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून भाषण केलं. हे भाषण म्हणजे २०१९ च्या निवडणुकांसाठीचे भाषण असल्याचं अनेकांना वाटत होतं. आपल्या भाषणामध्ये विरोधकांना चापट्या मारत प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांना शाब्दीक शाबासकी दिली. तीन तलाक, सर्जिकल स्ट्राईक, २०२२ पर्यंत अंतराळात मानवरहीत यान पाठवण्याचा निर्धार, पंतप्रधान जनआरोग्य सेवेचे सूतोवाच करणे हे काही जणांना निवडणुकीत भाषण ठोकल्याप्रमाणेच वाटत होते. अनेकांनी त्यांची ही भावना ट्विटरवरून व्यक्तही करून दाखवली

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भाषणातील ठळक मुद्दे खालील प्रमाणे आहेत

  • हा देश थांबणार नाही, झुकणार तर अजिबात नाही
  • देशाला कुपोषण मुक्त करण्यासाठी मी बेचैन आहे
  • मी आपल्यापुढे निघून गेलेल्या देशांपुढे आपल्या देशाला नेण्यासाठी उतावीळ आहे
  • प्रत्येकाला घर, प्रत्येकाला वीज, प्रत्येकाला पाणी, शौचालय, कुशलता मिळावं, उत्तम आरोग्य सेवा मिळावी, प्रत्येकाला विमान सुरक्षा मिळावी , प्रत्येकाला इंटरनेट मिळावं यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत
  • भाई-भतीजावाद नाही, सबका साथ म्हणजे सबका साथच
  • नक्षलवाद १२६ जिल्ह्यांऐवजी ९० जिल्ह्यांपुरताच उरला आहे
  • हल्ली ईशान्य हिंदुस्थानातून दहशतवादाच्या बातम्या ऐकू येत नाही
  • मुसलमान महिलांना मी आश्वस्त करतो की त्यांना न्याय मिळावा, त्यांचा हक्क अबाधित रहावा यासाठी पूर्ण प्रयत्न करेन
  • कोणालाही कायदा हातात घेण्याची परवानगी नाही
  • बलात्काऱ्यांच्या राक्षसी वृत्तीपासून देशाला मुक्त करण्यासाठी फाशीच्या निर्णयाच्या बातम्या जास्तीत जास्त प्रसारीत झाल्या पाहीजेत
  • शॉर्ट सर्व्हीस कमिशनच्या माध्यमातून नियुक्त महिला अधिकाऱ्यांची पुरुष अधिकाऱ्यांच्या समकक्ष स्थायी कमिशनद्वारे पारदर्शक निवड केली जाणार, मोदींची नवी घोषणा
  • सर्वोच्च न्यायालयात ३ महिला न्यायमूर्ती विराजमान झाल्या आहेत, समस्त महिला वर्गाला अभिमान वाटावा अशी ही गोष्ट आहे
  • लाच घेणाऱ्यांवर कठोर कारवाई होतेय
  • देशात पूर्वी प्रत्यक्ष कर भरणारे ४ कोटी नागरीक होते, आता ही संख्या दुपटीने वाढून पावणे सात कोटी झाली आहे
  • प्रामाणिक करदात्यांना मी अभिवादन करतोय, कारण त्यांच्यामुळे योजना चालतात
  • दलाल रेशन घोटाळा करत होते, आम्ही हा घोटाळा थांबवला
  • ६ कोटी बोगस लाभार्थी होते, त्यांची नावे काढणं हे किचकट काम होतं
  • दलालांकडून देश लुटला जात असताना मी डोळे बंद करून बसू शकत नाही
  • पूर्ण युरोपच्या लोकसंख्येएवढे लाभार्थी हिंदुस्थानात आयुष्यमान योजनेचे असतील
  • २५ सप्टेंबरपासून पंतप्रधान जनआरोग्य सेवेला सुरुवात होईल
  • १० कोटी कुटुंबांना आरोग्यविम्याचे कवच मिळेल
  • जन आरोग्य सेवेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला ५ लाख रुपयांचा वार्षिक आरोग्य विमा मिळेल
  • WHO ने म्हटलंय की स्वच्छतेमुळे ३ लाख मुलांचे जीवन वाचले आहे
  • स्वच्छता अभियानाची २०१४ साली खिल्ली उडवण्यात आली होती
  • खादीची विक्री दुपटीने वाढली आहे
  • इथेनॉलचे उत्पादन तीनपटीने वाढले आहे
  • आम्ही लोण्यावर रेघोट्या मारणारे नसून दगडावर रेषा ओढणारे आहोत
  • २०२२ पूर्वी मानवाला अंतराळात पाठवण्याचे उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेवले आहे, मानवाला अंतराळात पाठवणारा हिंदुस्थान हा चौथा देश बनेल
  • २०२२ मध्ये  देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होतील. २०२२ साली किंवा त्यापूर्वी मानवाला अंतराळात पाठवणार
  • मंगळयानाची सफलता, एकाचवेळी १०० उपग्रहष अंतराळात सोडून वैज्ञानिकांनी त्यांचे सामर्थ्य दाखवून दिले आहे
  • आपला देश अत्यंत वेगाने प्रगती करतोय
  • १३ कोटी लोकांनी Mudra loan घेतलं, यातील ४ कोटी हे तरुण आहेत
  • पूर्वी मोठ्या शहरांची चर्चा होत होती आता छोट्या शहरांची आणि गावांचीही चर्चा व्हायला लागली आहे
  • एकेकाळी ईशान्येकडील राज्यांना वाटायचं की दिल्ली दूर आहे, मात्र आम्ही दिल्लीला ईशान्येकडील राज्यांच्या दारात आणून उभी केली आहे
  • ईशान्येकडच्या राज्यांमधून आज महामार्ग होतायत, विमानतळं होतायत अशा बातम्या यायला लागल्या आहेत
  • देशात पासपोर्टची ताकद वाढली आहे
  • देशावर टीका करणारे आता म्हणायला लागले आहेत की झोपलेला हत्ती आता उठलाय आणि पळायला लागला आहे
  • जवान तीन चार दशकांपासून वन रँक वन पेन्शनची मागणी करत होते, आम्ही ती पूर्ण केली
  • दिवाळखोरीसाठीचा कायदा नव्हता, तो आम्ही केला
  • बँकीग क्षेत्राला ताकदवान बनवण्यासाठी एक ताकद लागते, दम असावा लागतो
  • GST बाबत अनेक वर्षांपासून चर्चा सुरू होती, आज तो अंमलात आला आहे
  • MSP किमान आधारभूत मूल्याची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत होती, आम्ही त्यावर निर्णय घेतला
  • मोठी लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून वाटचाल सुरू केली पाहीजे
  • पंतप्रधानांनी भाषणात सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख केला.
  • देशात मोबाईलचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन होतंय
  • महामार्ग बनवण्याचे काम दुपटीने वाढले
  • गेल्या ४ वर्षात देश बदल अनुभवतोय
  • गॅस सिलिंडर, ऑप्टीकल फायबर लावण्याचे काम, गावागावात वीज पोहचवण्याचे काम २०१३ सालच्या वेगाने केले असते तर कदाचित १०० वर्ष लागली असती ते पूर्ण करायला
  • २०१३ सालच्या वेगाने चाललो असतो तर शौचालयं बांधण्याचे उद्दीष्ट केव्हा पूर्ण केलं असतं कोणास ठावूक
  • सव्वाशे कोटी जनता हीच या देशाची खरी ताकद आहे
  • गरीब, मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गाला प्रगती करण्यात अडथळे येऊ नये यासाठी संविधानाने बळ दिले
  • बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात देशाला सर्वसमावेशक संविधान मिळाले
  • चंद्रपूरच्या एव्हरेस्टवीरांचे पंतप्रधानांनी कौतुक केले
  • OBC आयोगाला संवैधानिक दर्जा दिला
  • २०१९ च्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लाल किल्ल्यावरील शेवटचे भाषण