
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आम आदमी पार्टीचे नेते आशुतोष यांनी बुधवारी पक्षाचा राजीनामा दिला. माझ्या खासगी कारणास्तव ‘आप’चा राजीनामा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे, मात्र त्यांचा हा राजीनामा आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी फेटाळला आहे.
आम्ही तुमचा राजीनामा कसा काय स्वीकारू शकतो? या जन्मात तरी नाही, असे केजरीवाल यांनी हा राजीनामा फेटाळताना म्हटले आहे.
Every journey has an end. My association with AAP which was beautiful/revolutionary has also an end.I have resigned from the PARTY/requested PAC to accept the same. It is purely from a very very personal reason.Thanks to party/all of them who supported me Throughout.Thanks.
— ashutosh (@ashutosh83B) August 15, 2018
राज्यसभेचे तिकीट कापल्याने बिनसले
या वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीतील राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक जाहीर झाली त्यावेळी आशुतोष हे आपमधील एक प्रबळ दावेदार होते, परंतु त्यांना तिकीट काही मिळाले नाही. तेव्हापासून ते पक्षावर नाराज होते. याच राज्यसभेच्या निवडणुकीनंतर कुमार विश्वास यांनी बंडखोरी केली होती. या बंडखोरीशी आशुतोष यांच्या राजीनाम्याची तुलना आता राजकीय वर्तुळात केली जात आहे.
प्रतिक्रिया देण्यास नकार
या राजीनाम्याप्रकरणी मी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर, प्रतिक्रिया देणार नाही, बाइट देणार नाही असे आशुतोष यांनी ट्विट केले आहे. शेवटी कोणत्याही प्रवासाला एक अंत असतो. आपल्यासोबतचा प्रवास हा खूप क्रांतिकारी आणि अतिशय चांगला होता, असेही त्यांनी पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकार्याना उद्देशून म्हटले आहे. वैयक्तिक कारणामुळे मी शुद्ध मनाने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून पक्षाच्या कार्यकारिणीने माझे राजीनामापत्र स्वीकारावे, असेही आशुतोष यांनी या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
To media friends. Please respect my privacy. I won’t be giving any bite of any kind. Please cooperate.
— ashutosh (@ashutosh83B) August 15, 2018




























































