
सामना ऑनलाईन । मुंबई
गुजरातमधील एका व्यक्तीला ३०० मुलांची तस्करी करताना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. एका मुलाची किंमत ४५ लाख असून त्यांना अमेरिकेत पाठवण्याच्या तयारीत असताना एका सजग अभिनेत्रीमुळे हे प्रकरण पुढे आले आहे. पोलिसांनी राजेश गमलेवाला या मुख्य आरोपीसह पाच जणांना अटक केली आहे.
गमलेवाला याला पोलिसांनी अहमदाबादहून अटक केली असून तस्करी होणार्या मुलांचे वय ११-१६ दरम्यान आहे. ही मुलं गरीब घरातील आहेत आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मोठा होता. नेमकी हीच बाब हेरून गमलेवाला मुलांच्या पालकांकडून त्यांना विकत घेत असे. अशीच मुलं शोधावी असे अमेरिकेच्या ग्राहकांकडून त्याला सांगण्यात आले होते.
गमलेवालाने त्यासाठी एक टीमही बनवली होती. गरीब व गरजू लोकांना हेरून तो मुले विकत घेत असे. मुलांना विकण्यापूर्वी त्यांचा मेक अप केला जाईल जेणेकरून ते सुंदर दिसतील. मेकअप करून त्यांचे फोटो काढले जाई. आणि त्याच फोटोचा वापर करून पासपोर्टही बनवले जाई.
प्रिती सूद ही अभिनेत्री मार्चमध्ये वर्सोवामध्ये गेली होती. तेव्हा तिला काही लोक अल्पवयीन मुलींना मेकअप करताना दिसली. एवढा मेकअप करण्याचे कारण तिने विचारले असता, या मुलींना अमेरिकेत त्यांच्या पालकांकडे अमेरिकेत पाठवण्याचे कारण त्यांनी दिले. सूद यांनी त्यांना पोलिसांकडे जयाला सांगितले, त्यावर त्यांनी नकार दिला. सूद यांनी पोलिसांना बोलावले तेव्हा तिघांपैकी एकाने पळ काढला.
या मुली गुजरातच्या मेहसाना जिल्ह्यातल्या होत्या. सलूनमध्ये काही अल्पवयीन मुली आल्याची माहिती सूद यांच्या मैत्रिणींनी कळवली. या मुलींना वैश्याव्यवसायासाठी तयार करण्यात येणार असल्याचा संशय सूद यांना आला आणि हे रॅकेट मोठे असल्याचा त्यांच्या लक्षात आले.
या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी चौघांना अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे अटक झालेल्यांपैकी एक निवृत्त पोलीस उप निरीक्षकांचा मुलगा आहे. गमलेवाला आपल्या साथीदारांशी व्हॉट्स ऍपवरून संपर्कात होता. याच क्रमांकाच्या आधारावरून पोलिसांनी गमलेवालाला पकडले. गमलेवाला २००७ साली मुंबईत खोटे पासपोर्ट बनवण्याच्या आरोपाखाली अटक झाली होती.
गमलेवालाला लहान मुलांची तस्करी करणे आणि त्यांन वैश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली असून १८ ऑगस्टपर्यंत पोलीस सुनावली आहे. तर इतर चार आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
summary : child trafficking racket busted by actress preeti sood
























































