
सामना ऑनलाईन । महाराजगंज
बुधवारी 15 ऑगस्टला हिंदुस्थानचा 72 वा स्वातंत्र्या दिन सर्वत्र उत्साहात साजरा झाला. देशभर देशभक्तीपर गाणे, विविध कार्यक्रम आणि झेंडावंदन करून स्वातंत्र्या दिन साजरा झाला. परंतु उत्तर प्रदेशमधील महाराजगंजमध्ये एक संतापजनक प्रकार घडला. येथील एका मदरशामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा तर फडकवला गेला परंतु मौलवीने मदरशातील मुलांना आणि शिक्षकांना राष्ट्रगीत गाण्यास मज्जाव केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.
UP के महराजगंज में मौलवी जुनैद अंसारी ने झंडा फहराने के बाद राष्ट्रीय गान गाने से किया इंकार @ippatel pic.twitter.com/UzmRjwxkQC
— Aviral Srivastava (@anshpatrkaar) August 15, 2018
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानतंर या आधारे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मोहम्मद जुनैद अन्सारी, मोहम्मद अझलूर रेहमान आणि मोहम्मद निजाम अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
थाना कोल्हुई क्षेत्र के बड़गो स्थित मदरसा स्कूल से सम्बन्धित वायरल वीडियो के सम्बन्ध में अपर पुलिस अधीक्षक महराजगंज द्वारा दी गयी बाइट @Uppolice @adgzonegkr @diggorakhpur @News18UP @aajtak @bstvlive @Indianewsup #UPPolice pic.twitter.com/CaVIi3M0Dr
— MAHARAJGANJ POLICE (@maharajganjpol) August 15, 2018























































