
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानच्या राजकारणातील ‘अटलयुगा’चा गुरुवारी अस्त झाला. देशाच्या राजकीय इतिहासातील महान तपस्वी, सर्वसमावेशक आणि उत्तुंग नेतृत्व, अमोघ वक्तृत्वाचे धनी, भाजपचे ‘पुराणपुरुष’, माजी पंतप्रधान, ‘भारतरत्न’, अटलबिहारी वाजपेयी यांचे संध्याकाळी राजधानीत महानिर्वाण झाले. ९३ वर्षीय अटलबिहारींची एम्स रुग्णालयातील मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाजपेयी यांच्या ‘महानिर्वाणा’ने अवघा देश हळहळत आहे. अजातशत्रू आणि दिग्गज नेते असलेल्या वाजपेयी यांच्या महानिर्वाणावर सर्वच पक्षांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अनेक राज्यांतून असंख्य नेत्यांनी दिल्लीकडे धाव घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा रात्री राजधानीत दाखल झाले आणि त्यांनी देशाच्या या महान सुपुत्राचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली.
माझा जिवलग मित्र गेला- लालकृष्ण आडवाणी
गेली नऊ वर्षे सार्वजनिक जीवनापासून दूर असलेले अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती वयोमानानुसार खालावली होती. गेल्या नऊ आठवड्यांपासून त्यांच्यावर राजधानी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अटलजींची प्रकृती सुधारावी यासाठी ‘एम्स’च्या डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. देशभरात सर्वधर्मीयांकडून अनेक ठिकाणी प्रार्थना केली जात होती. मात्र सायंकाळी वाजपेयींची प्राणज्योत मालवली आणि अवघा देश शोकसागरात बुडाला.
अटलजींच्या निधनानं मी शून्य झालो- पंतप्रधान मोदी
आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
वाजपेयींचे पार्थिव उद्या शुक्रवारी सकाळी 6 ते 9 या वेळेत त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत भाजप मुख्यालयात त्यांचे पार्थिव ठेवण्यात येईल. दुपारी 1 नंतर अंत्ययात्रेला सुरुवात होईल. सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी त्यांच्या पार्थिवावर राजघाट शेजारी स्मृतिस्थळावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
वाजपेयी आधुनिक युगाचे अजातशत्रू होते – व्यंकय्या नायडू
सात दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. राष्ट्रध्वज तिरंगा अर्ध्यावर उतरविण्यात येईल असे केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केले आहे. दरम्यान, वाजपेयी यांच्या निधनाबद्दल बिहार, मध्य प्रदेश आणि झारखंड सरकारनेही 7 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. बिहार सरकारने उद्या शासकीय सुट्टीही जाहीर केली आहे, तर उत्तर प्रदेश सरकारने शुक्रवारी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. पंजाब सरकारने राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून उद्या सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
खेळाडूंनी वाहिली अटल बिहारी वाजपेयींना श्रद्धांजली
सन्मान
1992 -पद्मभूषण
1993 -डी. लिट (कानपूर विद्यापीठ)
1994 -लोकमान्य टिळक पुरस्कार (पुणे)
1994 -उत्कृष्ट संसदपटू
2015 -भारतरत्न
2015 -बांगलादेश लिबरेशन वॉर सन्मान (बांगलादेश)
देश एका विराट नेत्याला मुकलाय
एक विलक्षण सर्वमान्य नेता, अमोघ वक्ता आणि कवीमनाचा सहृदयी राजकारणी म्हणून अटलजी नेहमीच आमच्या हृदयात कायम राहतील. माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ अटलबिहारी वाजपेयी यांच्या देहावसानाने देश एका विराट आणि दूरदर्शी नेतृत्वाला मुकला आहे. – रामनाथ कोविंद, राष्ट्रपती
अटलजी कायम स्मरणात राहतील – राष्ट्रपती रामनाथ कोविंद
त्यांच्या जाण्याने मी निःशब्द आहे
आमचे सर्वांचे श्रद्धेय अटलजी आता आमच्यात राहिले नाहीत. आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण राष्ट्राला समर्पित करणाऱया या महान नेत्याच्या निर्वाणाने मी निःशब्द झालोय. पण मनात विचारांचे काहूर आहे. अटलजी यांच्या जाण्याने एका महान युगाचा अंत झालाय. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
अटलजींच्या निधनानं मी शून्य झालो- पंतप्रधान मोदी
देशाचा महान सुपुत्र हरपला
अटलबिहारी वाजपेयी यांच्या महानिर्वाणाने देशाचा एक महान सुपुत्र हरपला आहे. त्यांच्या प्रेरणीय कार्याच्या स्मृती आमच्या हृदयावर कायम कोरलेल्या असतील. अटलजी यांचे कुटुंबीय आणि देशभरातील त्यांचे लाखो चाहते यांच्या दुःखात मी सहभागी आहे. – राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष
हिंदुस्थानने एक महान सुपुत्र गमावला – राहुल गांधी






















































