अटलबिहारी वाजपेयी यांना नगर शिवसेनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नगर

देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आज नगर शहर शिवसेनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. येथील नेताजी सुभाष चौकामध्ये ‘वाजपेयी अमर रहे, अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख दिलीप सातपुते नगरसेवक अनिल शिंदे, सचिन जाधव, संजय शेंडगे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, योगीराज गाडे रवी वाकळे, संभाजी कदम, सुरेश तिवारी, युवा सेनेचे जिल्हा अधिकारी विक्रम राठोड, महिला आघाडीच्या अरुणा गोयल आदींसह युवा सेना, महिला आघाडी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी बोलताना शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी ”देश एका थोर नेत्याला मुकला आहे. आपल्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी अनेक विषय हाताळले आहेत, त्यांची आठवण कायम सर्वसामान्यांच्या स्मरणामध्ये राहील”, असं मनोगत व्यक्त केलं. ”राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी देशावरचं प्रेम सर्वसामान्यांपर्यंत कशा पद्धतीने जाईल याची आठवण सदैव मनामध्ये राहिली आहे. त्यांच्या निधनाने हिंदुस्थानाचा मोठं नुकसान झालं आहे”, असं म्हणत शिवसेनेच्या वतीने वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करत असल्याचं राठोड यावेळी म्हणाले.