उर्दूत शपथ घेताना चुकले इम्रान खान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ या पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान पंतप्रधानपदाची शपथ घेतली. क्रिकेटमधून निवृत्त होऊन गेली २२ वर्षे इम्रान खान राजकारणात सक्रीय आहेत. पाकिस्तानचे राष्ट्रीय भवन एवान-ए-सद्रमध्ये राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी इम्रान खान यांना पंतप्रधानपदाची शपद दिली. समारंभाची सुरूवात पाकिस्तानच्या राष्ट्रगीताने झाली. शपथ घेताना इम्रान खान उर्दू बोलताना अडखळत होते.

शपथ घेताना खलिस उर्दूत लिहिलेले शब्द वाचताना इम्रान खान यांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी राष्ट्रपती हुसैन यांनी अनेक वेळा त्यांचे चुकीचे उच्चार दुरूस्त केले. पहिल्यांदा एका शब्दाचा उच्चार इम्रान करू शकले नाही तेव्हा राष्ट्रपतींनी तो शब्द पुन्हा उचारला. आपली चूक सावरत इम्रान खान यांनी मोठा कष्टाने ते शब्द वाचले. राष्ट्रपतींनी ‘रोज ए कयामत’ म्हटले इम्रान खान यांनी या शब्दाचा उच्चार ‘रोज ए कयादत’ असा केला. ही चूक लक्षात आल्यावर खान यांनी माफी मागितली आणि योग्य उच्चार केला. शपथविधी दरम्यान इम्रान खान यांना उर्दू शब्द उच्चारता येत नव्हते. शेवटी कसाबसा त्यांनी आपला शपथविधी पूर्ण केला.