देशातील १०० नद्यांमध्ये वाजपेयींच्या अस्थींचे विसर्जन होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंचत्वात विलीन झालेले हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे देशातल्या १०० नद्यांत विसर्जन करण्यात येईल. रविवारपासून वाजपेयींच्या अस्थी गंगेत विसर्जन करून या कार्यास प्रारंभ होईल. नंतर हरिद्वारमध्येही अस्थींचे विसर्जन केले जाईल. भाजप अध्यक्ष अमित शहा, गृहमंत्री राजनाथ सिंग व वाजपेयींचे नातेवाईक त्यांच्या अस्थी गंगेत विसर्जित करतील.

भाजपने १५ दिवसांची कार्यक्रमपत्रिका जारी केली आहे. यात वाजपेयींच्या अस्थी कुठल्या नदीत विसर्जित केल्या जातील त्याची माहिती देण्यात आली आहे. ज्या नद्यांमध्ये वाजपेयींची अस्थी विसर्जित केल्या जातील त्यापैकी २२ नद्या उत्तर प्रदेश मधील आहेत, महाराष्ट्रातील ९, तमिळनाडूतील ८, बिहार, कर्नाटक आणि ओडिशामधील ७, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील ४ नद्यांचा समावेश आहे. तर उत्तराखंड व पंजाबमधील तीन, असाम, पश्चिम बंगाल, तेलंगाणा, राजस्थान, जम्मू कश्मीर, गोवा, हिमाचल प्रदेशच्या दोन व दिल्ली, केरळ, सिक्कीम आणि दमनमधील प्रत्येकी एका नदीचा समावेश आहे.