मावा रोगाला कंटाळून शेतक-याने मूग उपटून फेकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

तालुक्यातील ब्रम्हगाव येथे खरीपाच्या पेरणीनंतर पावसाने दडी मारली. यामुळे येथील एका शेतकऱ्याने विहिरीच्या पाण्यावर कसे-बसे मूग पिकवले. पण त्यावरही मावा रोगाने आक्रमण केल्याने शेंगाधरणीत आलेले खरीपाचे अख्खे पीक वाया गेले. यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्याने एक एकरावरील मूगाचे पीकच उपटून फेकले. चंद्रकांत शिंदे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

बीडमध्ये दिड महिन्यांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली खरी. पण समाधानकापक पाऊस झाला नाही. यामुळे चंद्रकांत यांनी त्यांच्या एक एकर जागेवर मूगाचे पीक लावले. पाण्याची कमतरता असल्याने त्याने विहीरीच्या पाण्यावर मूग वाढवले. रोपट्यांना शेंगाही आल्या. यामुळे चंद्रकांत सुखावला. पण त्यावर पीकावर अचानक मावा रोगाने हल्ला केल्याने अख्खे उभे पीक वाया गेले. पीक लावणीसाठी केलेला खर्चही न निघाल्याने चंद्रकांत यांचे कुटुंबीय हवालदिल झाले. यामुळे निराश झालेल्या चंद्रकांत यांनी मूक उपटून फेकले. चंद्रकांत यांच्याप्रमाणे इतरही शेतकऱ्यांच्या पिकांना मावा रोगाचा फटका बसला आहे. कृषि विभागाने याची तत्काळ दखल घ्यावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दिड महिन्याचे विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावूनही फायदा नसल्याने तालुक्यातील ब्रम्हगाव येथील शेतक-याने चक्क एक एकावरील चार ते पाच फुट वाढलेले मुगाचे पिक उपटून फेकले असून चंद्रकांत शिंदे असे या शेतक-याचे नाव आहे. एक तर पाऊस नाही, कसे बसे विहिरीच्या पाण्यावर मुग पिक वाढवले शेंगधरणीत आल्यानंतर मावा या रोगाने हल्ला चढवला त्यामुळे मुगास आलेल्या शेंगा जळु लागल्या तीन वेळेस औषध फवारणी करुनही मावा आटोक्यात येत नव्हता. चंद्रकांत शिंदे यांनी एक एकरात मुग पेरणी केली होती पिकासाठी तेरा हजार रुपये खर्च आला परंतु उत्पन्न मात्र काही मिळणार नसल्याने शेतातील उभे मुगाचे पिक उपटून फेकले आहे. झालेला खर्चही न निघाल्याने शिंदे कुटूंबीय अर्थिक अडचणीत सापडले आहे. शासनाने तालुक्यात अद्याप कोठेही पिकांचे पंचनामे केले नसल्याने शेतक-यांना नुकसान भरपाई मिळेल की नाही या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

summary…farmer destroy own crop in beed