दुरशेतमध्ये शेकापला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, पेण

पेण तालुक्यातील दुरशेत येथील शेतकरी कामगार पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करून शेकापला खिंडार पाडले आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच रायगड जिल्हा सल्लागार किशोर जैन व उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड यांच्या प्रयत्नाने शेकापचे प्रशांत बाबुराव गावंड यांच्या नेतृत्वाखाली शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पेण येथे झालेल्या झालेल्या कार्यक्रमात जाहीर प्रवेश केला.

यावेळी शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार किशोर जैन, उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड, वासुदेव म्हात्रे, अॅड. विकास म्हात्रे, तरणखोपचे सरपंच अभिजित पाटील, जगदीश ठाकूर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना किशोर जैन म्हणाले की शिवसेनेत सर्वांना सन्मानाची वागणूक दिली जाते तसेच तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.